शब्बीरपूरमधील दलितांसाठी 5 मे चा दिवस एक नव्या संघर्षाला जन्म देणारा होता. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिल्ह्यातील हे गाव. मे मध्ये हे नाव भारताच्या नकाशावर ठळकपणे उमटलं ते तिथं घ़डवून आणलेल्या दंगलीमुळं. शब्बीरपूरमधील 65 दलितांची घरं जाळून टाकण्यात आली. त्यांना मारहाण करण्यात आली. सहारणपूर म्हणजे उ. प्रदेशमधील दलित राजकारणाचा केंद्रबिंदू. बहुजन समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला. या भागातील 7 विधानसभा जागांपैकी 5 जागा बसपाच्या हक्काच्या. पण यावर्षी झालेल्या निवडणुकीमध्ये या भागातून एकही बसपाचा उमेदवार निवडून आला नाही. या मतदारसंघामध्ये बसपाचा पराभव याची चर्चा संपते की नाही तोच योगी आदित्यनाथ यांनी शपथविधी घेतल्यापासून या भागात दलितांवर निर्माण करण्यात येत असलेली दहशत, करण्यात आलेला हिंसाचार व दंगल हा इथल्या स्थानिक दलितांना आलेला अनुभव.
नुकताच औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सहारणपूर हिंसाचारबदद्लचे कार्यक्रम झाले. अग्नी भास्कर बुद्ध नावाचा या हिंसाचारात बळी पडलेला नागरिक देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन खंबीरपणे 5 मे ला सहारणपूरमध्ये नक्की काय झालं हे सांगतोय. अग्नी प्रकाश बुद्ध यांच्यासह त्यांच्या पत्नी, आ, वडील आणि मुलांना या दंगलीमध्ये जबर मारहाण करण्यात आली. या हिंसाचारात मोडलेला हात अजूनही प्लास्टरमध्ये आहे. त्यांच्या पत्नीवर तलवारीने 9 ते 10 घाव घालण्यात आले होते. 26 तारखेला नाशिकमध्ये कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या हाताची तपासणी केली असता दोन गंभीर फ्रॅक्चर असल्याचं लक्षात आलं. पण दंगल झाल्यानंतर ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले तिथं मात्र ही बाब ध्यानात आली नाही किंवा मुद्दामहून दुर्लक्ष करण्यात आलं.
अग्नी प्रकाश बुद्ध सांगतात, 20 एप्रिलला (आंबेडकर जयंतीच्या 6 दिवसानंतर) शब्बीरपूरपासून जवळच असणाऱ्या सडक दुधली गावात काही हिंदुत्व संघटनांनी आंबेडकर जयंती साजरी करायचा प्रयत्न केला. हातात भगवे झेंडे, आंबेडकरांचा फोटो आणि घोषणा देण्यात येत होत्या, जय श्री राम, देश मै रहना है तो मोदी कहना होगा, यूपी मै रहना है तो योगी कहना होगा. मंदीर वही बनायेंगे च्या घोषणा देण्यात येत होत्या. म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीचा उपयोग करून इथल्या दलित आणि मुस्लिमांमधील तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न. त्यात ते अयशस्वी झाले. सहारणपूरमधील ही अशी काही गावं आहेत जिथं आजपर्यंत आंबेडकर जयंती कधीच साजरीच करण्यात आली नाही. सरकार कोणाचंही असो आजपर्यंत परवानगी मिळालीच नाही. पण यावर्षी हिंदुत्वावादी संघटनांतर्फे दलित मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी हा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला.
एकीकडे पंतप्रधान आणि त्यांचे समाविचारी लोक आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बाबासाहेबांसमोर लोटांगण घालण्याचं नाटक करत होते, तर दुसरीकडं शब्बीरपूरमधील लोकांना त्याच बाबासाहेबांची मूर्ती स्थापन करण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करावा लागत होता. प्रशासानाच्या मते, त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांचा दबाब आहे. या सर्व अनुभवाबद्दल त्याच्या मनात असेलली चीड त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती.
अग्नीप्रकाश सांगत होते, हम लोग बाबासाहब का एक चबुतरा बना रहे है. जमीन हमारी है. कानून का कोई उल्लंघन नही है. जिस बाबासाहब ने कलम की जोर पर पूरे भारतीयों के लिये जिने का अधिकार दिया. किसीसे भेदभाव नही किया. वो बाबासाहब न्याय के प्रतिक है. उस न्याय की मूर्ती लगाने के लिये हमने भूके रहकर पैसे कमाये, अच्छे कपडे न पहने. और आप उसे विरोध कर रहे है. हमसे आप चाहे वैसै नारे लगाना चाहते है. भाई विद्नान को तो विद्नान ही कहा जायेगा. किसी मूर्ख को जबरदस्ती से थोडे ही विद्नाव बनाया जा सकता है. हम तो बाबासाहब को ही बाप कहेंगे. आप जबरदस्ती हमसे दूसरे को क्यू बाप कहने को बोल रहे हो. आज मूर्ती की परमिशन नही दे रहे है. कल शादी के लिऐ और बच्चे पैदा करन के लिऐ भी इनसे परमिशन लेनी पडेगी ? हा प्रश्न मात्र ही लोकं कोणत्या परिस्थितीमधून जात असतील याची जाणीव करून देण्यासाठी पुरेसा आहे.
5 मेचा दिवस त्यांच्या आयुष्यावर मोठा घाव घालेल असं कधीच अग्नि प्रकाश यांना वाटलं नव्हतं. गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कारण शब्बीरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या शिमलाना गावात राजपूत संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याची परवानगी पण काढली होती. त्या ठिकाणी फुलन देवीचा मारेकरी शेर सिंग राणा याचा सत्कार करण्याचं नियोजन ही करण्यात आलं होतं. त्यानंतर परवानगी नसतानाही डीजे, ढोल, तलवारी आणि बंदुकीच्या फायरिंग करत एक रॅली आजूबाजूच्या पाच गावांमधून नेण्यात आली. त्यात शब्बीरपूरचाही समावेश होता. शब्बीरपूरमधीन रॅली निघून गेल्यानंतर त्याच्या पाठोपाठ आलेल्या जमावाने गावातील दलित वस्तीवर हल्ला केला. घरं जाळली. असलेल्यांना जबर मारहाण केली. पाच तास हा सर्व प्रकार चालू होता. पोलिस फक्त बघ्याची भूमिका घेत होती. वर पोलिसांनीच दलित वस्तीवर फायरिगं केली. कोणतीच प्रशासकीय यंत्रणा सात तासापर्यंत तिथं पोहचली नाही. संपूर्ण दलित वस्तीला स्मशान बनविण्यात आलं. म्हणजे हा सर्व हिंसाचार प्रशासनाच्या पाठिंब्याने आणि पूर्व नियोजीत होता असं अग्नि प्रकाश ठामपणे सांगतात.
यातली सर्वात गंभीर बाब म्हणजे, गोरक्षेच्या नावाखाली माणसांच्या हत्या करणाऱ्या या मंडळींनी दलित वस्तीतील गायींवरही तलवारीने वार केले. म्हणजे दलितांची गाय यांच्या गोरक्षेच्या अजेंड्यात बसत नसावी.
सहारणपूरमध्ये जे घडलं ते अचानक नव्हतं. त्याचे प्रयत्न दररोज करण्यात येत होते. दररोज दहशत निर्माण करण्यात येत आहे. जिस दिन से योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बने है, तबसे इनके कार्यकर्ता हर रोज गाडी पै तलवार लेके घुमते दिख रहे है. गाडी पे बैठ कर कर तलवार रास्तों पर घसीट कर लेके जा रहै है. आखिर ये सरकार तलवार दिखाके हमे क्या संदेश देना चाहती है. किन्हे दिखाया जा रहा है की हमारे पास तलवार का बल है और इतनी तलवार लेके घुमने वालों पै एक भी धारा लगाई नाही जा रही है. हे वास्तव मांडण्यासाठी हा माणूस फिरतोय. यूपीमध्ये परिस्थिती किती बिकट बनत चालली आहे, त्याची तीव्रता हा माणूस बोलत असताना जाणवत असतेच.
मुलाखतीच्या शेवटी अग्नि प्रकाश यांना विचारलं, आपको डर नही लगता है. आप इतना घूम रहे है, आपके घरवालों पे इतना बडा हमला हुआ है. त्यावर हा माणूस जोरात हसला आणि तो जे बोलला ते भारतातल्या सर्वांना बळ देणार ठरो.
हम बाबासाहब को मानते है. बाबासाहेब हमारे अंदर डर पैदा नही होने देते है. वे तो अकेले लढे थे. हम तो इतने लोग है. उनकी हर बात का जवाब दिया जायेगा. हम कानून की मदत से अपनी लढाई जारी रखेंगे. हमने सम्मान के लिये, बच्चो को बचाने के लिये, आपने महापुरूषों के सम्मान के लिऐ हमने प्रतिकार की कोशिश की तो हम पे ही केस डाला. 2012 मै मुजफ्फरनगर का दंगा हुआ था. एक बार जानवर को मूं मै खून लग जाये तो उसे खून की आदत लग जाती है. वैसे ही शासक लोंगों के मूं मै खून लगा है. इसी लिऐ वो तलवार दिखा रहे है. हमारे इरादे तोडना चाह रहे है. हमे भी पता है ये चलने वाला है.
पर भाई साहब,
हमारे बदन पे घाव है, पर इरादे अभी भी बुलंद है...
Great... Balanced, in depth writing
ReplyDelete